मायक्रोसॉफटने अखेर अॅपल आयपॅड वापरणार्या युजरसाठी एमएस ऑफिस सेवा देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आजपर्यंत मायक्रोसॉफटने ही सेवा फक्त विंडोज ऑपरेटिग सिस्टीम असलेल्या उपकरणांसाठीच आत्तापर्यंत उपलब्ध करून दिली होती.

मायक्रोसॉफटच्या सीईओ पदावर आल्यानंतर सत्य नडेला यांनी घेतलेल्या पहिल्याच वार्ताहर परिषदेत ही सेवा विंडोज वापरणार्यांबरोबरच अन्य ऑपरेटिंग सिस्टीम वापरणार्यांनाही देण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्याची सुरवात अॅपलपासून केली जात आहे. एमएस ऑफिस पॅकेजमध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट या सेवा अंतर्भूत असून त्याचे अॅप स्टोअरमधून मोफत डाऊन लोडिंग करता येणार आहे.