सॅमसंग गॅलेक्सी एस ५ – बुकींग २९ मार्चपासून

सॅमसंगचा बहुचर्चित गॅलेक्सी एस ५ स्मार्टफोन ११ एप्रिलला भारतात लाँच केला जात असून त्याची किंमत ५१ हजार व ५३ हजार रूपये आहे. या फोनसाठी प्री लाँच बुकींग २९ मार्चपासून सुरू होत आहे.

अॅड्राईड ४.४.२ किटकॅट ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या या स्मार्टफोनसोबत सॅमसंगने ३ वेअरेबल उत्पादनेही सादर केली आहेत. गिअर टू (किंमत २१९००), गिअर फिट व गिअर निओ (किंमत प्रत्येकी १५९००) अशी ही उत्पादने आहेत. सॅमसंगने भारतात आत्तापर्यंत ३ कोटी ५० लाख गॅलेक्सी उत्पादने विकली आहेत त्यात स्मार्टफोन आणि टॅब्लेटचा समावेश आहे.

सॅमसंगचे भारतासाठीचे कंट्रीहेड विनित तनेजा म्हणाले की लोकांना दर्जेदार उत्पादने हवी असतात आणि त्यासाठी किंमत मोजण्यास ग्राहक तयार असतो हा आमचा अनुभव आहे. गॅलेक्सी एस ५ साठी इएमआय व बायबॅक ऑफर कंपनी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment