भाजपची मनसेविरुध्द निवडणूक आयोगाकडे तक्रार

पुणे- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना मनसेच्या राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी नमो नमो जप करण्यास सुरूवात केली आहे. मनसेने नरेंद्र मोदीचा प्रचार सुरु केल्या ने भाजपची मंडळी धास्तावली असून त्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेवून मनसेने मोदी यांचा प्रचार थांबवावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग या संदर्भात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मनसे व राज यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दोन दिवसापूर्वी पुण्यातील मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत मोदीनामाचा जप सुरु होता. एवढेच नव्हे तर मनसेचे काही कार्यकर्ते मोदींचे स्टीकर घेऊन आले होते. तसेच ‘अब की बार, मोदी सरकार’, ‘नमो नमो’, ‘नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा देत होते. याबाबत पुण्यातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात आणून देताच प्रदेश भाजपने याबाबत मनसेला तंबी दिली आहे. तसेच याबाबत निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे.

भाजपचे निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्रीकांत भारतीय, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी मुंबई भेटीवर असलेले मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्याकडे केली आहे. संपत निवडणूक आयोगाच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र दौ-यावर आले आहेत. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन महायुतीच्या विरोधात मनसेने उमेदवार करू नयेत. तसेच मोदींच्या पंतप्रधानपदासाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मतविभाजन टाळावे अशी विनंती केली होती. मात्र, भाजपने मनसेला स्पष्ट तंबी देत नमो नमो जयघोष बंद करण्यासाठी फटकारले आहे. आता मनसे व राज यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Leave a Comment