
प्यांगयांग- उत्तर कोरियातील पुरूषवर्गासाठी आगळेच फर्मान सरकारने जाहीर केले आहे. त्याप्रमाणे सरकारने घालून दिलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार उत्तर कोरियातील पुरूषांना देशाचा नेता किम जोंग उन याच्याप्रमाणेच केस कापून घ्यावे लागणार आहेत. कांही आठवड्यापूर्वी हा नियम फक्त राजधानी प्यांगयांग मधील पुरूषांसाठीच लागू होता मात्र हळूहळू तो देशभर लागू केला जात आहे. यामुळे संपूर्ण देशात आता किम जोंग प्रमाणेच हेअरस्टाईल असलेले पुरूष पाहायला मिळतील.
