सलमानला दिलासा; सुनावणी पुढे ढकलली

मुंबई- अभिनेता सलमान खानच्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाची सुणवणी गुरुवारी होणार होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी साक्षीदार नसल्या ने पुढे ढकलली आहे. त्या मुळे आता अभिनेता सलमान खानला थोडा दिलासा मिळालाय. या प्रकरणाची सुनावणी आता ८ एप्रिलला होणार आहे.

या सुनावणीदरम्यान तीन मुख्य साक्षीदार कोर्टात हजर न झाल्याने ही सुनावणी टळली. याचिकाकर्ते तीन मुख्य साक्षीदारांना कोर्टासमोर हजर करणार होते. त्यापैकी एक बांद्रा येथील लाँड्री मालक आहे. मात्र ही व्यक्ति पॅरालाईज असल्यामुळे तर दुस-या साक्षीदाराच्या घरातील सदस्याचे निधन झाल्याने कोर्टात हजर राहू शकले नव्हते. तर तिसरा साक्षीदार सध्या मलेशियात आहे. त्याझमुळे या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यासत आली आहे.

सलमान खानच्याल हिट एंड रन प्रकरणी सलमानच्या याचिकेवर सेशन कोर्टात सुनावणी होणार होती. वांद्रे कोर्टाने याप्रकरणी सलमानच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचा आदेश दिला. वांद्रे कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सलमानने सेशन कोर्टात अपील केले आहे. सदोष मनुष्यवधाचा खटला चालल्यानंतर सलमान दोषी आढळल्यास त्याला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या केसकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.