उद्धव ठाकरे हे आपले प्रेरणास्थान- राखी सावंत

मुंबई – अभिनेत्री राखी सावंत आागामी काळात निवडणूक लढविणार असल्या ने ती आता नेतेमंडळीविषयी मत व्यीक्त करू लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपले प्रेरणास्थान असल्याचे मत अभिनेत्री राखी सावंत हिने प्रसारमाध्यसमाशी बोलताना व्यपक्त् केले. निवडणूकीच्या् रिंगणात असलेल्याव राखीने त्यामुळे प्रेरणास्थान असलेल्या उद्धव यांची स्तुती केली आहे.

काही दिवसापूर्वीच ‘केजरीवाल यांच्यापेक्षा राखी सावंत बरी’ असा अग्रलेख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’तून लिहिला होता. त्यातूनच आपण प्रेरणा घेतली असून, ते वाक्य खरे करून दाखवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे मत अभिनेत्री राखी सावंत हिने व्यक्त केले आहे.

यासंदर्भात अभिनेत्री राखी सावंत हिने ओशिवरा येथील निवासस्थानी तिने याबाबत पत्रकार परिषद घेतली. काही दिवसांपूर्वीच ती भाजपची सदस्य झाली होती. मात्र बंडखोरी करत तिने शिवसेनेविरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यामुळे प्रेरणास्थान असलेल्या उद्धव यांची स्तुती करत त्यांच्यावरच कुरघोडी करण्याची पहिली राजकीय खेळी राखी हिने खेळल्याचे बोलले जात आहे.

नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहण्याचा हातखंडा असलेल्या राखी सावंत हिने थेट निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच तिने दिल्लीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते. मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळेल, अशी तिला अपेक्षा होती. मात्र भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे बंडखोरी करत भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेविरुद्धच उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय राखीने घेतला आहे.तरीही तिने चक्क उद्धव ठाकरेंचेच गोडवे गात उद्धव आपले प्रेरणास्थान असल्याचे तिने सांगून टाकले. त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखातून प्रेरणा घेऊनच निवडणूक रिंगणात उतरल्याचे तिने स्पष्ट केले.

Leave a Comment