विष खाइन, पण शिवसेना सोडणार नाही-रामदास कदम

मुंबई- काही दिवसापासून मला शिवसेना सोडण्यामसाठी ब-याच ऑफर येत आहेत. पण अशा आफरना आपण भीक घालत नसून एकवेळ विष खाऊन मरेन, पण शिवसेना सोडणार नाही, असे मत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राणे यांना ठणकावले आहे. काही दिवसापूर्वी कदम यांना महसूलमंत्री नारायण राणें यांनी शिवसेना सोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे.

यावेळी पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘नारायण राणे यांनी आपल्याला शिवसेना सोडण्यासाठी काही कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती, मी कडवा शिवसैनिक आहे, एकवेळ विष खाऊन मरेन, पण शिवसेना सोडणार नाही, असं त्यांनी ठासून सांगितले आहे. त्याळमुळे आगामी काळात रामदास कदम शिवसेना सोडणार, ही अफवाच ठरली आहे.’

दरम्यान, विनायक राऊत यांनी केवळ एम.ए. च्या पार्ट वनच्या अॅडमिशनची सर्टीफीकेट सादर केली, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी विनायक राऊत दहावी नापास असल्याचा दावा केला होता हा दावा फेटाळत विनायक राऊत यांनी आपल्या एम एच्या सर्टिफिकेटची कागदपत्रच पत्रकारांसमोर सादर केली होती.आता नितेश राणेंनी त्यावर पुन्हा उत्तर दिल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राणें यांनी डॉक्टरेट केल्याची कागदपत्रे देण्याचे प्रति आव्हान राऊत यांनी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणूकी दरम्या न हा वाद चिघळणार असे दिसत आहे.

Leave a Comment