इलेक्टॉनिक्स वस्तू उत्पादनात चांगलेच नांव असलेली एलजी कंपनी घरात लावण्यासाठी स्मार्ट बल्ब लवकरच बाजारात आणत आहे. विशेष म्हणजे हा बल्ब फोन येताच ब्लींक होतो आणि फोन आल्याची सूचना देतो. वायफाय आणि ब्ल्यू टूथच्या सहाय्याने तो मोबाईलला कनेक्ट करता येतो.

या बल्बला विविध रंगी कॅप दिल्या असल्याने कॅप बदलली की बल्ब वेगळा रंग घेतो. आयओएस व अॅड्राईड सिस्टीम असलेल्या स्मार्टफोनलाह हा जोडता येतो. त्याची किंमत ३२ डॉलर्स असून तो लवकरच बाजारात दाखल होत आहे. या बल्ब बरोबरच एलजी एक नवा फ्रिजही बाजारात आणत आहे. यात केवळ १० मिनिटात बिअर थंडगार करण्याची सोय देण्यात आली आहे.