भाजपचे प्रचार गाणे मोदींच्या आवाजात

भाजपने निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रचार गाण्याचा अल्बम सौगंध या नावाने मंगळवारी  प्रकाशित केला असून यातील प्रचार गाणे खुद्द मोदींच्याच आवाजात असल्याचे समजते. संवाद स्वरूपी हे गाणे – मै देश नहीं मिटने दूँगा, मैं देश नही झुकने दूँगा असे असून ते प्रसून जोशी यांनी लिहिले आहे. त्याला आदेश श्रीवास्तव यांनी संगीत दिले असून गायक सुखविदरसिंग यांनी ते गायले आहे. मात्र प्रत्येक कडव्याची सुरवात मोदींच्या आवाजात आहे. याचा व्हीडीओही जारी करण्यात आला आहे.

मोदींच्या देशभरात १८५ पेक्षा अधिक रॅलीज होणार असून या रॅलीचे निमंत्रण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच या निमंत्रणावर मोदी यांची सहीही असेल असे समजते. मोदींनी देश रक्षणासाठी देशकी मिटटीची शपथ घेतली असून ती शपथ ते पुरी करणार असा संदेश भाजपतर्फे देशभरात दिला जात आहे.

Leave a Comment