टाटा स्टीलच्या बोरीवली जागेची ११५५ कोटींना विक्री

देशातील अग्रणी स्टील कंपनी टाटा स्टीलने त्यांची मुंबईच्या बोरिवली भागात असलेली २५ एकर जमीन ई ऑक्शनने नुकतीच विकली असून ओबेरॉय रिअॅलिटीने ही जागा ११५५ कोटी रूपयांना खरेदी केली असल्याचे समजते. ओबेरॉयने या व्यवहाराला दुजोरा दिला असला तरी या जागेवर नक्की काय करणार हे अद्याप निश्चित नसल्याचे सांगितले आहे.

या जागेच्या विक्रीसाठी डिसेंबरमध्येच निविदा मागविल्या गेल्या होत्या. त्यात सर्वाधिक किंमतीची निविदा ओबेरॉय रिअॅलिटीकडूनच आल्याचे समजते. विशेष म्हणजे टाटांच्या स्वतःच्या टाटा हौंसिंगनेही या जागेसाठी निविदा भरली होती. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ ही जागा आहे. ओबेरॉय रिअॅलिटीचा एक बांधकाम प्रकल्प सध्या गोरेगांव पूर्व भागात सुरू आहे.

Leave a Comment