जोगेश्वरीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबई – जोगेश्वरी परिसरातील आरे कॉलनी भागात राहत असलेल्या एका सोळावर्षीय मुलीवर चार नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणातील पीडितेला आरोपींनी दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौंघा जणांना अटक केली आहे.

या प्रकरणातील पीडित मुलीला १५ मार्च रोजी तिच्या मित्रांनी गोरेगाव येथील शेरे पंजाब मार्ग येथील महापालिकेच्या मैदानात बोलावले होते. यावेळी तिच्या चार मित्रांनी तिला दारू पाजली. यावेळी पीडित तरुणी नशेत असल्याचा फायदा घेत तिला आरे कॉलनी परिसरातील जंगलात नेले. त्यातवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानतर या मुलीला त्यांनी १६ मार्च रोजी सकाळी तिच्या हॉस्टेलच्या बाहेर आणून सोडले.

त्यादिवशी ही मुलगी दिवसभर नशेतच असल्याने झोपून होती. त्याच संध्याकाळी पुन्हा या चौघांनी तिला त्या ठिकाणी बोलावले आणि पुन्हा तिला दारूपाजून तिच्यावर अत्याचार केला. दुस-या दिवशी पहाटे पुन्हा तिला हॉस्टेलवर आणून सोडले. ही मुलगी शुद्धीत आल्यावर तिला वेदना जाणवू लागल्या. तिला दोन रात्री झालेल्या प्रकाराबाबत काहीच कल्पना नव्हती. तिने तिच्या मित्रांजवळ विचारणा केल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी हॉस्टेलच्या वॉर्डनने विचारणा केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघांना अटक केली, असे मेघवाडीचे गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक गणोरे यांनी सांगितले.

या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणात आरोपी हुसैर इक्बाल खान हुजी, आमीर मुस्तकीन चौधरी, कांती विठ्ठल अरोलिया पटेल आणि अजराम जैयस्वाल अशी चौघांची नावे असून त्यांना न्यायालयाने २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

Leave a Comment