कारच्या किंमती वाढण्याचे संकेत

नवी दिल्ली – फेब्रुवारीत जाहीर झालेल्या अंतरीम अर्थसंकल्पात वाहनांवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने विविध वाहन कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती कमी केल्या होत्या. मात्र आता उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण देऊन महिंद्रा, टाटा आणि होंडा या वाहन उत्पादक कंपन्यांनी कारच्या किमती वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बाकी वाहन कंपन्याही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढीची घोषणा लवकरच करतील असेही सांगितले जात आहे.

फेब्रुवारीत किंमती कमी झाल्यानंतर कार बाजारात थोडी सुधारणा दिसून आली होती. मात्र आता दरवाढ झाल्यास पुन्हा एकदा बाजार थंड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महिंद्राचे सीईओ प्रवीण शहा यांनी वाहनांच्या किमती वाढणार याला दुजोरा दिला आहे तर टाटा कंपनीने प्रवासी वाहन किंमतीत १ ते २ टकके वाढ होऊ शकते असे सुचविले आहे. होंडाने मात्र किमती किती वाढतील हे आत्ताच सांगता येणार नाही असे सांगितले आहे.

Leave a Comment