मोदी सरकारात मी मंत्री होणार- रामदास आठवले

मुंबई – रिपब्लीकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात मोदी सरकार सत्तेत येईल आणि त्यात आपण मंत्री असू असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की आमची महायुती झाली ओहे. मी आमच्यासाठी तीन जागा मागितल्या होत्या मात्र शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाजपक्ष आमच्यात आल्याने तो आग्रह मी सोडला आहे. विधानसभेसाठीच्या निवडणुकांत मात्र आम्ही ३५ जागा लढविणार आहोत.

लोकसभा निवडणुकांनंतर भाजप सेना बरोबर आम्ही लिखित करार करणार आहोत त्यात महाराष्ट्रात सत्तेत आम्ही १५ टक्के भागीदारी मागितली आहे व त्याला उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी संमती दर्शविली आहे. विधानसभेत ६ मंत्रीपदे आमच्याकडे असतील. राष्ट्रवादी व कॉंग्रेसबरोबर आम्ही १५-१८ वर्षे राहिलो मात्र त्यांनी कधीच आम्हाला सत्तेत वाटा दिला नाही अथवा बरोबरीने वागविले नाही. शरद पवार यांच्याबरोबरचे वैयक्तीक संबंध राहतील मात्र राजकीय मैत्री राहणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.

निवडणुक आयोगाकडून पक्षाला मान्यता मिळण्यासाठी किमान दोन जागा जिंकाव्या लागतात. सध्या आमच्यापुढे तेच मुख्य ध्येय आहे असे सांगून ते म्हणाले की सातारा मतदारसंघातून उदयन राजे यांनीच आमच्याशी संपर्क साधला होता मात्र ऐनवेळी ते राष्ट्रवादीकडून उभे राहिले आहेत. सातार्‍यात युतीचा उमेदवार नक्कीच विजयी होईल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment