पाणी विकणारे एटीएम मुंबईत

केवळ १ रूपयांत १ लिटर पाणी विकणारे देशातले पहिले एटीएम किवा व्हेंडिग मशीन मुंबईतील मानखुर्द येथे बसविले गेले आहे. वंदना फौंडेशन व अन्य नॉन प्रॉफिट संस्थांनी एकत्र येऊन ही सोय नागरिकांना करून दिली आहे. अॅक्वाक्राफ्ट असे या योजनेचे नामकरण केले गेले असून यासाठी वापरले जात असलेले व्हेंडींग मशीन दिवसाला १० हजार लिटर पाणी देऊ शकणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत म्हणजे केवळ १ रूपयांत १ लिटर पाणी येथे मिळू शकेल.

मानखुर्द भागात दूषित पाण्याचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे या भागातच प्रथम हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. मुंबईकरांची त्यामुळे मोठीच सोय होणार आहे. प्रीपेड कार्डवर हे मशीन ऑपरेट होऊ शकणार आहे.