जगातील सर्वात तरूण देश दक्षिण सुदान मध्ये भारतीय डॉक्टर जणू देवदूत बनले आहेत. सुदान पासून स्वतंत्र झालेल्या या देशाची परिस्थिती बिकट असल्याने संयुक्त राष्ट्राने येथे आरोग्य व स्वास्थ सुविधा पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार भारतानेही आपले डॉक्टर्स येथे रूग्णसेवेसाठी पाठविले आहेत.
या संदर्भात यूएन मिशन इन साऊथ सुदान तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार नील जिल्हयात भारतीय हॉस्पिटल उत्तम कार्य पार पाडत आहे. या अशात भागात ४१ बालकांनी जम्म घेतला आहे त्यातील पहिले बालक युद्ध परिस्थिीतीतच जन्माला आले आहे. मात्र अतिशय धैर्याने येथील डॉक्टर्स भारतीय शांती सेनेच्या संरक्षणाखाली रूग्णांना मदत करत आहेत. त्यांनी दाखविलेले साहस आणि निष्ठा याबद्दल भारतीय शांती सेना आणि वैद्यकीय पथकाचा सन्मान केला गेला आहे.
या रूग्णालयाचे प्रमुख डॉ. कर्नल सौरभ भारद्वाज म्हणाले की देशातील गर्भवती महिलांना येथेच आणले जात आहे. डिसेंबरपासून आत्तापर्यंत ९७६ रूग्णांवर उपचार केले गेले आहेत आणि १३४ मोठ्या यशस्वी शस्त्रक्रीया केल्या गेल्या आहेत. गोळीबार सुरू असतानाही येथील काम सुरूच होते असेही ते म्हणाले.