कोलंबो: श्रीलंकेचा प्रसिद़ध विकेटकिपर कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय ट्वेण्टी२० क्रिकेटला आता बाय बाय करण्यायचा निर्णय धेतला आहे. आगामी काळात बांगलादेशातील टी-२० विश्वचषकानंतर संगकारा आंतरराष्ट्रीय ट्वेण्टी-२० क्रिकेटमधून निवती स्वीरकारणार आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना संगकाराने ही माहिती दिली.
श्रीलंकेचा प्रसिद़ध विकेटकिपर ३६ वर्षीय संगकाराचा हा पाचवा टी-२० विश्वचषक आहे. मात्र तो आणखी काही काळ वन डे आणि कसोटीत तसेच आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये खेळत राहणार आहे. वयोमानानुसार आता नवीन खेळाडूना खेळण्याीसाठी संधी मिळावी म्ह णून हा निर्णय घेत असल्यााचे त्यांनी सांगितले.
संगकारा श्रीलंकेकडून ५० ट्वेण्टी २० सामन्यांमध्ये खेळला आहे. त्याने आतापर्यंत १ हजार३११ धावा जमा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १२० होता. विकेटकिपींग करताना त्यां नी बहूमुल्या असे योगदान क्रिकेटसाठी दिले आहे. संगकाराने २००९च्या ट्वेण्टी-२० विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचं नेतृत्त्व केले होतं. त्यानंतर २०१२मध्ये आपल्या संघाला २०१२च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाचं योगदान दिलं होते.