विराट करील सर्व विक्रम नावावर- झहीर अब्बास

फतुल्ला : टीम इंडियातील आघाडीचा फलंदाज विराट कोहली हा गेल्याीकाही दिवसांपासून संघाची गरज ओळखून कुशलतेने खेळण्याच्या शैलीत बदल करत आहे. त्याीमुळे आगामी काळात दमदार फलंदाजीच्याु जोरावर तो क्रिकेटविश्वालतील फलंदाजीचे सर्व विक्रम मोडेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही असे मत पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज झहीर अब्बास यांनी वर्तविले.

यावेळी बोलताना झहीर अब्बास म्ह णाले, टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली याच्यात जबरदस्त क्षमता आहे. भविष्यात तो जागतिक फलंदाजीतील सर्व विक्रम आपल्या नावावर करू शकतो. त्या.ची फलंदाजीचीशैली उत्ततम आहे. आतापर्यंत केलली कामगिरी दमदार आहे.

टी-२0 विश्व्चषक स्पर्धेसाठी पाक संघ बांगलादेशात दाखल झाला आहे. सध्या पाकिस्तान संघाचे फलंदाजी सल्लागार असलेल्या अब्बास यांनी विराटवर स्तुतिसुमने उधळली. फलंदाजांच्या सरावानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘‘विराटच्या क्षमतेबाबत वादच नाही. अलीकडील काळात एक मॅच्युअर फलंदाज म्हणनू तो पुढे आला आहे. आपल्या तंत्रात त्याने लक्षणीय सुधारणा केली आहे. त्याोमुळे आगामी काळात तो यशस्वीं फलंदाज ठरणार आहे.

Leave a Comment