तर केजरीवालांना तुरुगांत टाकू- आठवले

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल या ना त्या कारणाने वादात सापडत आहेत. केजरीवाल याना मोठे करण्यादत सिंहाचा वाटा असलेल्या माध्यमांवरचे ते आरेाप करीत सुटले आहेत. आगामी काळात जर रालोआचे सरकार सत्तेवर आले तर केजरीवाल यांना आम्हीच त्यांना तुरुंगात टाकू, असा सज्जड दम रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्ह्णाले, स्वआताला तुम्ही आम आदमी पक्षाचे नेते म्हणवता, मग आम आदमीला दहा हजारांचे जेवण कसे परवडते, अशा शब्दांत केजरीवाल यांच्या पार्टीची खिल्ली उडवली. केजरीवालांनी काशीतून उभे राहावे आणि स्वत:ची काशी करून घ्यावी, असे वक्तव्य ही यावेळी आठवले यांनी केले.

आप या पक्षाचा आरक्षणाला विरोध नाही, असे आता केजरीवाल सांगत आहेत. मात्र, दलित, आदिवासी आणि अल्पभूधारक शेतकर्यां साठी आपकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. संविधान न मानणार्या आपला मतदार थारा देणार नाहीत, अशी टीकाही आठवले यांनी केली. आता केजरीवाल या टीकेला कशा प्रकारे उत्तदर देतात याकडे लक्ष लागले आहे.