भारतीय कंपन्यांच्या परदेशी गुंतवणुकीत वाढ

दिल्ली – चालू आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांची परदेशातील गुंतवणूक वाढली असून अनेक परदेशी कंपन्या भारतीय कंपन्यांनी अधिग्रहित केल्या आहेत असे केअर रेटिंगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चालू आर्थिक वर्षात जानेवारी ते एप्रिल या दरम्यान भारतीय कंपन्यांनी २९.३४ अब्ज डॉलर्सचे सौदे केले आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षात परदेशातील गुंतवणूक लक्षणीयरित्या घटली होती. २००६-०७ ते २०१०-११ या काळात परदेशी गुंतवणुकीसाठी उदार धोरण राबविले गेले होते त्यामुळे या काळात परदेशात गुंतवणूक खूपच गतीने वाढली होती मात्र त्यांनतच्या दोन वर्षात ती एकदमच खाली आली आणि आता पुन्हा २०१३-१४ मध्ये त्यात सुधारणा होताना दिसत असल्याचेही हा अहवाल सांगतो.

२०१२-१३ या वर्षात ही गुंतवणूक केवळ ७.१३ अब्ज इतकीच होती तर २०११-१२ मध्ये ती ११.१८ अब्ज डॉलर्स इतकी होती.