रत्नागिरीत अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून महिलेवरील अत्यारचाराच्या घटनात वाढ होत आहे. बांगलवाडी तालुका रन्नागिरी येथील एका अपंग मुलीवर वांरवार सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हात दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत या प्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली.

रत्नागिरी येथील बांगलवाडी भागात राहत असलेल्यास एका अपंग मुलीवर सहा नराधमांनी मिळून बलात्कार केला. रत्नाागिरी तालुक्यातील महिन्याभरातील बलात्कार आणि सेक्स स्कँडल प्रकरणातील हा सातवा गुन्हा आहे. या पूर्वी रत्नागिरीच्या दापोलीमधील `पैशांचा पाऊस` प्रकरणात सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरी शहरातील सेक्स स्कँडलच्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

या मुलीच्या गरिबीचा फायदा घेत आरोपी मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून बलात्कार करीत असल्याीचे उघड झाले आहे. बांगलवाडी भागात राहत असलेल्या‍ या मुलीवर बलात्काार करणा-या सहा आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.