राष्ट्रीय प्रतीकांचा वापर- आपविरोधात याचिका दाखल

मुंबई – अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने राष्ट्रध्वज आणि अशोकचक्र या राष्ट्रीय प्रतीकांचा वापर राजकीय लाभासाठी केल्याप्रकरणी केजरीवाल, मयंक गांधी आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राम समुद्रे यांनी ही याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी १२ मार्च राजी होणार आहे.

समुद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार आप पक्षाने त्यांच्या वेबसाईटवर तसेच रॅलीतून राष्ट्रध्वज आणि अशोकचक्र या राष्ट्रीय प्रतीकांचा वापर केला आहे. राजकीय लाभासाठी असा वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे ही याचिका दाखल केली आहे. न्यायाधीश मोहित शहा, एम.एस.संकलेचा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे.