परदेशातून बनावट नोटांची तस्करी वाढली

लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर परदेशातून बनावट नोटा भारतात येण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असल्याचे महसूल विभागाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पाकिस्तानात छापलेल्या या भारतीय चलनाच्या बनावट नोटा श्रीलंका, नेपाळ, बांग्लादेशाबरोबरच मलेशिया आणि व्हीएतनाम मार्गेही भारतात आणल्या जात असल्याचे समजते.

महसूल विभागाने एप्रिल २०१३ ते जानेवारी १४ पर्यंत भारताबाहेरून नोटा येण्याचे पाच प्रकार उघहकीस आणले होते व त्यात८ जणांना अटकही झाली होती. त्यात ३ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता. बनावट नोटा सहज ओळखू येत नाहीत आणि हे चलन परदेशातून भारतात आणण्यासाठी गरीब गरजू लोकांचा वापर केला जातो त्यासाठी त्यांना पैसे दिले जातात असेही समजते. निवडणूकांच्या काळात असा पैसा येण्याचे प्रमाण वाढते असते आणि त्या दृष्टीने आवश्यक दक्षतेचे उपाय महसूल विभागाकडून योजले जातात असे महसूल अधिकारी सांगतात.