मुंबई – मॅप माय इंडिया तर्फे गाड्यांसाठी नेव्हीगेशनचे काम करू शकणारा स्मार्ट मिरर बाजारात आणला गेला आहे. हा रियरव्ह्यू मिरर असला तरी रिव्हर्स कॅमेरा स्क्रीनसारखाही याचा वापर करता येतो व त्यामुळे तो चालकांसाठी ड्रायव्हिंग असिस्टंट ठरतो असे कंपनीचे म्हणणे आहे.
वाहन चालविताना कुठेही चुकू नये अथवा रस्त्यापासून भरकटले जाऊ नये यासाठी हा मिरर ड्रायव्हरने सतत पाहायचा आहे. हा मिरर थ्रीडीचा अनुभव चालकाला देतो तसेच नेव्हीगेटर म्हणूनही काम करतो. वाहन पुढे जाईल तशा यावरच्या आकृत्या बदलतात आणि तुम्ही कुठून आला आहात तेही हा मिरर दाखवितो. हा मिरर कारमध्ये कोणतेही बदल न करता सहज बसविता येतो.
मॅप माय इंडियातर्फे नऊ भारतीय भाषात व्हॉईस गाइडची सुविधा दिली जाते. या मॅपमध्ये १० शहरांचे स्थानिक नकाशे, त्यातील सर्व महत्त्वाच्य जागा, २० लाख किमीचे रस्ते नेटवर्क कव्हरेज, शहरांतील ६०२८ रस्ते, ५२ शहरांतील घरांचे पत्ते , ६० हजार गावे, ८८ शहरातील टू डी ,थ्रीडी लँडमार्क असा डेटा ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. स्मार्ट मिरर १५,९९० रूपयांत उपलब्ध होणार असून तो सर्व प्रमुख शहरे, ऑनलाईन शॉपिंग तसेच इलेक्ट्रोनिक्स दुकाने व कार अक्सेसरीजच्या दुकानातून मिळू शकणार आहे.