गारपिटग्रस्त भागांची पवार, ठाकरे करणार पाहणी

मुंबई: मराठवाडयात गेल्या आठ दिवसांपासून गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. निवडणूकीमुळे या भागांचा दौरा कुठल्याच राजकीय पक्षानी केला नव्हता. आता मात्र राज्यातील नेत्यांना मुहूर्त मिळाला आहे. राष्ट्रवादीची नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे रविवारी मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

गेल्या सहा दिवसापासून मराठवाडयात सर्वत्र गारपीटीने हाहाकार उडावला आहे. मात्र एकाही नेत्याने प्रलयग्रस्त भागात जाऊन शेतक-यांचे सांत्वहन केलेलं नाही. आता सर्वच नेतेमंडळी या भागाचा दौरा करीत असल्यारने ते काय मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नेत्यांच्या आजच्या दौ-यामुळे किमान शेतक-यांना काय मदत मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे

शरद पवार परभणीत गारपीटग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. तर उद्धव ठाकरे औरंगाबाद, जालना आणि परभणीच्या दौ-यावर असतील. भाजप नेते गोपीनाथ मुंडेही मराठवाड्याच्या विविध भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यालमुळे शेतक-यांच्यां पदरात काही तरी पडेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment