क्रिस गेलचे टी-२० संघात पुनरागमन

अँटीग्वा – आगामी काळात बांगलादेशात होत असलेल्या टी-२० च्या वर्ल्डकप सामन्यातून वेस्टइंडीजचा आक्रमक सलामीवीर क्रिस गेलने पुनरागमन केले आहे. गेला हा पाठीला झालेल्या दुखापतीमुळे गेल्याम एक महिन्यांपासून संघाबाहेर होता. इंग्लंडविरुद्ध होणा-या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत तो आगामी काळात खेळणार आहे.

गेल्या महिन्यात आयर्लंडविरुद्ध खेळताना ख्रीस गेलला दुखापत झाली होती. त्यामुळे नुकत्यात झालेल्या तीन दिवसांच्या एकदिवसीय मालिकेलाही तो मुकला होता. आगामी काळात बांगलादेशात होत असलेल्या टी-२० च्या वर्ल्डकप सामन्याातून तो खेळणार की नाही याबाबत अनिश्चीेतता होती.

बांगलादेशात होणा-या टी-२० विश्वचषकाच्या तोंडावर कॅरेबियनांचा जीव भांड्यात पडला आहे. या दौ-यासाठी निवडलेला संघ पुढीलप्रमाणे आहे : डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युअल्स बद्री, क्रिस गेल, ड्वेन ब्रॉव्हो, जॉन्सन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, सुनील नरेन, दिनेश रामदीन, रवी रामपाल, आंद्रे रसेल, मार्लोन सॅम्युअल्स, कृष्मर संतोकी, लिंडल सिमन्स आणि ड्वेन स्मिथ.

Leave a Comment