मनसे देणार शिवसेनेला कडवे आव्हान

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना- मनसे यांच्यातील दरी खूपच वाढली आहे. त्यामुळेच आगामी काळात होत असलेल्या व लोकसभा निवडणूकीत मनसेने शिवसेनेच्याा विरोधात तगडे उमेदवार उभे केले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेचा फटका महायुतीला बसू नये म्हणून भाजप नेत्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा वाया जाणार असल्याचे दिसत आहे. निवडणूकीत शिवसेनेला कडवे आव्हान देण्यासाठी मनसेने कंबर कसली आहे.

आगामी काळात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार मनसेने केला असल्यालची माहिती सूत्रांनी दिली आहे. दक्षिण मुंबईतून सेनेच्या अरविंद सावंतांविरोधात मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर उभे राहण्याच्या तयारीत आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळें विरोधात आदित्य शिरोडकर, तर उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तीकर विरोधात महेश मांजरेकर आणि पुणे मावळमधून अभिनेते अमोल कोल्हेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याळसोबतच पुण्यानमधून माजी आमदार दीपक पायगुडे हे उभे राहणार असल्याचे समजते.

त्यामुळे आगामी काळात होत असलेल्याब निवडणूकीत विशेषता मुंबईतील महत्वाच्या मतदार संघात राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे सामना रंगलेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या आवहानामुळे शिवसेनेला ही निवडणूक जड जाणार असे वाटते.

Leave a Comment