आगामी काळात कंपनी सेकटरींची वाढती गरज

पुणे : कंपनी कायद्यात नव्याने करण्यात आलेले बदल लवकरच अमलात येणार असल्याने आगामी काळात कंपनी सचिवांची मोठी कमतरता भासणार आहे त्यामुळे इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक‘ेटरीज येत्या जून 2 0 1 4 पासून फौन्डेशनसाठी संगणकाधारित परीक्षा पद्धत अमलात आणत आहे; तसेच सी एस प्रोफेशनल साठी ओपन बुक प्रारूप अमलात आणणार आहे अशी माहिती आय सी एस आय चे अध्यक्ष एस. श्रीधरन यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

ज्या विद्यार्थ्यांचा नोंदणीचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे त्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे असे नमूद करून श्रीधरन म्हणाले की कोचिंग आणि कम्प्लिशन प्रमाणपत्राची अट काढून टाकण्यात आली असून प्रशिक्षण कालावधीत पाच ते 1 5 हजार रुपये मानधन मिळू शकेल. सर्व खासगी व्यवसाय करत असलेल्या कंपनी सचिवांना महाराष्ट्र मूल्यवर्धित कायद्यानुसार ओळख मिळाली आहे. त्यामुळे अपिलेट कोर्टात त्यांना बाजू मांडता येईल. यु ट्युबवर आय सी ए आय प्रायमर ऑन कंपनी आक्ट या खाली 1 6 व्हिडिओ उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्योग आणि व्यवसायाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन नेशनल इन्स्टीट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट , इन्शुरन्स इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया , इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग अंड फायनान्स यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आले असून छोटे अभ्यासक‘म आणि कार्यशाळा घेतल्या जात आहेत.

Leave a Comment