
सोशल मिडीयाचा वाढता वापर पाहता या माध्यमातून अफवा पसरविण्याचे प्रमाणही लक्षणीय रित्या वाढत चालले आहे. येथे दिल्या जाणार्या बातम्या अथवा माहितीचा खरेखोटेपणा पडताळून पाहता यावा आणि संबंधित मजकूर केवळ अफवा पसरविण्याच्या हेतूनेच दिला गेला आहे काय याचा तपास करता यावा यासाठी संशोधन केले जात होते. शेफिल्ड विद्यापीठातील टेक्स्ट मायनिंग तज्ञ व वरीष्ठ संशोधक कलिना बोन्चेव्हा यांनी त्यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्यात यश मिळविले आहे. फेमे असे या सॉफ्टवेअरचे नामकरण करण्यात आले आहे.
