
नाझी नेता आणि जर्मनीचा हुकुमशहा अॅडाल्फ हिटलर याचे आत्मचरित्र माईन कांफ हे लिलावात काढले जाणार असून या दोन खंडातील आत्मचरित्रावर हिटलर याची स्वाक्षरी आहे. त्यामुळे हे दोन्ही खंड दुर्मिळ मानले जातात. नेट डी सॅडर्न्स ऑक्शनने हे आत्मचरित्र लिलावात काढले आहे. आणि सर्वाधिक बोली लावणार्याना हे खंड ऑनलाईन विक्रीतून मिळणार आहेत.
