राहूल गांधी स्टाईलने वर्ध्यात उमेदवाराची निवड

वर्धा- आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी वर्धा येथील कॉग्रेसचा उमेदवार स्थानिक सदस्यांच्या पसंतीने निवडला जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर निवडणूक घ्यावी असे आदेश राहुल गांधी यांनी दिले आहेत. त्या‍मुळे आता वर्धा जिल्ह्यात ही पद्धत वापरली जाणार आहे. यासाठीच्या निवडणूक प्रक्रियेला रविवारपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान यासाठी ९ मार्चला मतदान होईल. २६ फेब्रुवारीपर्यंत मतदार याद्या तयार करून जाहीर करण्यात येणार आहेत.

आगामी काळात होत असलेल्या पक्षीयस्तरावरील निवडणूकीसाठी २८ फेब्रुवारीला लोकसभा उमेदवारांची नामांकन जाहीर होणार आहे. त्यानंतर दोन मार्चला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. त्यामुळे आता राहुल स्टाईलने उमेदवाराची निवड पद्धती किती यशस्वी होते हे लवकरच करणार आहे.

या निवडणूक प्र‍क्रियेची घोषण नुकतीच करण्यात आली असून त्या पध्दतीने सर्वत्र तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणूकीच्या कामाला सर्वजण लागले असून, या निवडणूकीसाठी इच्छूक असलेल्यांनी तयारी सुरु केली आहे.