शिर्डी : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या खासदार भाउसाहेब वाकचौरेंच्या काँग्रेस प्रवेशाने शिर्डी येथील सेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या काळात प्रसारीत होत असलेल्या बातम्यामुळे सेनेने आंदोलन सुरू केले आहे. खासदार वाकचौरेंच्या निषेध म्हणून शिर्डी नगर परिषदेसमोर वाकचौरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्या चपलांचा हारही घालण्यात आला. तर दुसरीकडे खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी क्रुषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याेकडून २५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेनी केला आहे.
शिर्डी येथील सेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरें यांनी काँग्रेसकडून निवडणुक लढविण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांकडून २५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेनी केला आहे. त्यामुळे शिर्डी येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी त्यानी पैसे घेतल्यायचा आरोप त्यांच्यावर केला आहे.
आागमी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सेनेची साथ सोडणा-या वाकचौरें यांना आगामी काळात शिर्डीची जनता चांगलीच धडा शिकवेल असेही यावेळी सेना कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात तापलेल्या या राजकीय वादंगामुळे आचार संहिता लागण्यापूर्वीच निवडणुकींचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. सध्या येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.