कवठेमहांकाळ : भारताला स्वातंत्र मिळून साठ वर्ष पूर्ण झाली. या कालावधीत महाराष्ट्रातील एकही व्यक्ती पंतप्रधानपदी पोहोचू शकली नाही. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत राज्यातील कोणीच या पदापर्यंत पोहचू शकला नाही. त्यामुळे याचे मला आश्चर्य वाटते. या पदासाठी एक उमेदवारही आपण निर्माण करू शकलो नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी कवठेमहांकाळ येथील कार्यक्रमात व्यक्त केली.
कवठेमहांकाळ येथील नानासाहेब सगरे दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या प्रकल्पाचे उद्घाटन अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून राजकारणाचे सूत्र बदललत चालली आहेत. त्यामुळे आगामी काळात समाजहितासाठी जनतेच्या जिवावर निवडून येऊन राजकारणाचा स्वार्थासाठी उपयोग करणारे राज्यकर्ते तयार होत आहेत.’
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात उतरेलेली मंडळी स्वरताची मालमत्ता चौपट करण्यासाठी राजकारणाचा वापर करीत आहेत. अशा राजकारण्यांना खडसावण्या साठी युवा पिढीने जागत राहून पुढे आले पाहिजे. त्यांना याबाबतचा जाब विचारण्यायचे धाडस केले पाहिजे. गेल्याा काही दिवसांपासून सर्वत्र भ्रष्टाचारही बोकाळला आहे. भ्रष्टाचार करणा-या राजकीय मंडळींना आपण प्रश्न विचारले पाहिजेत, असेही नाना पाटेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.