कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सर्वच पक्षात खासदार फोडाफोडीची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे आता कोल्हापुर मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. आगामी काळात खासदार सदाशिव मंडलिक यांनी शिवसेनेच्या तिकीटावर पुन्हा लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्याखसाठी त्यांनी नुकतीच एक बैठक घेतली व त्यामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घेतली. आगामी काळात त्यामुळे मंडलिक विरुद्ध राष्ट्रवादीचे महाडिक असा थेट सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी होत असलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सदाशिव मंडलिक यांची शिवसेना प्रवेशाची घोषणा होण्याीची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून बाहेर पडलेलल्या मडलिकांनी अपक्ष निवडून आल्यानंतर काँग्रेसची हातमिळवणी केली होती. पण हा मतदारसंघ कॉंग्रेसला न सुटल्याने त्यांची गोची झाली होती. त्यामुळे त्यांनी राजू शेटीयांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्याीची तयारी सुरू केली होती.
त्यानंतर आता सदाशिव मंडलिक यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतले असल्यााचे दिसत आहे. त्यामुळे मंडलिकांनी जर महायुतीचा झेंडा हातात घेतला तर आघाडीच्या हातातील घड्याळाचा गती मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे मंडलिकाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.