सोमदेव देववर्मन दिल्ली ओपनच्या अंतिम फेरीत

नवी दिल्ली- दिल्ली येथील टेनीस ओपनच्या अंतिम फेरीत टेनिसपटू सोमदेव देववर्मन पोहोचला आहे. उपांत्य सामन्यात त्याीने रशियाच्या इव्हेग्ने डॉनस्कॉयचा त्याने ६-४, ६-२ ने धुव्वा उडवला. दोन्ही खेळाडूंतली ही तिसरी लढत होती. सोमदेव देववर्मनच्याा विजयाने आशा पल्लवीत झाल्या असून अंतिम सामन्यात त्याची कामगिरी कशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

यापूर्वी देखील दमदार का‍मगिरी करताना सोमदेव देववर्मनने मियामी मास्टर्स तसेच कोलकातील स्पर्धेत डॉनस्कॉयने त्याला हरवले होते. सोमदेवने डॉनस्कॉयविरुद्ध पहिल्याच विजयाची नोंद केली. दुसरा मानांकित आणि क्रमवारीत ९६ व्या क्रमांकावर असलेल्या सोमदेवने एक तास २८ मिनिटांत सामना आपल्या नावे केला. आतापर्यंत सोमदेवने दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याला विजयासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. सुरुवातीला पहिल्याच सेटमध्ये डॉनस्कॉयने घेतलेली आघाडी क्षणिक ठरली.

दरम्यान, दुबई दोन जगातील नंबर वन सेरेनाचे दुबई ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे माजी नंबर वन व्हीनस विल्यम्सने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात डेन्मार्कच्या कॅरोलीन वोज्नियाकीला पराभूत केले. तिने सरळ दोन सेटमध्ये उपांत्य सामना जिंकला. फ्रान्सची खेळाडू एलिझा कार्नेटने सेरेनाविरुद्ध लढतीत धक्कादायक विजय मिळवला. तिने सेरेनाला पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिले आहे.

Leave a Comment