दीपिकाची खळी आणि करिनासारखे नाक केवळ २०० रूपयांत

मुंबई – सुंदर असावे अणि सुंदर नसल्यास तसे दिसावे असे प्रत्येक माणसालाच वाटत असते. आजकाल तरूण तरूणींना आकर्षक दिसण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यातूनच कॉस्मेटिक सर्जरीचा उगम झाला आणि पाहता पाहता त्याची लोकप्रियताही खूपच वाढली. मात्र अजून तरी सुंदर दिसण्यासाठी हा मार्ग जरा खर्चिक आहे. त्यावर मुंबईच्या भायखळा येथील जेजे इस्पितळाने चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

आजकाल तरूणांना बॉलिवूड तारे तारखांसारखे दिसण्याचे वेड आहे. मुलांना शाहरूख सारखे दिसायचे असते तर मुलींना दीपिकासारखी गालावर गोड खळी पडलेली आवडते. करिनासारखे आपले नाक असावे असेही वाटते. या रूग्णालयाने केवळ २०० रूपयांत तरुणाईची ही स्वप्ने पूर्ण करण्याचा चमत्कार करून दाखविला आहे.

ज्या खळीसाठी खासगी कॉस्मॅटॉलॉजिस्टकडे किमान २५ हजार मोजावे लागतात आणि नाक बदलून घेण्यासाठी किमान १ लाख रू द्यावे लागतात त्यासाठी या रूग्णालयात केवळ २०० रूपये घेतले जातात. नाक, गाल, ओठ यांच्या सर्जरी येथे गेल्या वर्षभरापासून केल्या जात असून आत्तापर्यंत किमान ५०० जणांनी त्याचा लाभ घेतला आहे. अजूनही येथली गर्दी वाढतच चालली असल्याचेही सांगितले जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment