अमेरिकेत भारतीय बिड्यांवर बंदी

भारतीय उत्पादकांच्या बिड्यांवर अमेरिकेच्या खाद्य आणि औषध विभागाने बंदी आणली असून ही बंदी विक्री आणि आयात अशा दोन्हींसाठीही लागू आहे. २००९ सालापासून अमेरिकेत तंबाकू उत्पादनांसंबंधीची नियम कडक केले गेल्यानंतर बिडीवर बंदी आणण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. जस इंटरनॅशनल कंपनी या भारतीय उत्पादनाच्या बिड्यांच्या चार प्रकारांवर ही बंदी घातली गेली आहे. या बिड्यांचे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे कारण त्यासाठी दिले गेले आहे.

यापूर्वीच अमेरिकन खाद्य व औषध प्रशासनाने भारतीय बिड्या व सिगरेट विक्री करणार्‍या वेबसाईटवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. देसी स्मोक डॉट कॉम आणि वाँट स्मोक डॉट कॉम या धूररहित सिगरेट व बिड्या विकणार्‍या कंपन्यांच्या उत्पादनात भेसळ असल्याचे कारण त्यासाठी दिले गेले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत भारत आणि अन्य दक्षिण आशियाई देशातून बिड्या आणि सिगरेटी मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जातात कारण अमेरिकन उत्पादनांच्या तुलनेत त्यात निकोटीनचे प्रमाण अधिक असते.

Leave a Comment