ढोणीची आशिया चषकातून माघार

मुंबई- दुखापतीमुळे कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने आगामी आशिया चषकातून माघार घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत ढोणीच्या स्नायूला दुखापत झाली होती. ढोणीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ढोणीच्याजागी यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये २५ फेब्रुवारीपासून सुरु होणा-या या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २६ फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर दोन मार्चला भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी देशांची मिरपूरच्या मैदानात लढत होणार आहे.

Leave a Comment