भारतीय संघाने चांगली कामगिरी केली – ढोणी

वेलिंग्टन – न्यूझीलंड दौ-यात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत निराशाजनक कामगिरीमुळे दोन्ही मालिका गमावल्यानंतरही भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने संघाची कामगिरी चांगली झाल्याचे म्हटले आहे. भारताने न्यूझीलंड दौ-यात एकदिवसीय मालिका ०-४ ने गमावली तर कसोटी मालिकेत ०-१ ने पराभव झाला. मात्र यानंतरही ढोणीने संघाची कामगिरी चांगली झाल्याचे म्हणत संघाची पाठ थोपटली. ‘एकूण पाहता आमची कामगिरी चांगली झाली आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यानंतर आमच्या खेळात सुधारणा झाली आहे. आमच्या संघात उत्तम खेळाडू आहेत हे आम्ही दाखवून दिले आहे. कसोटी सामन्यात आम्ही प्रतिकूल परिस्थितीतही योग्य खेळ केला. तर दुस-या कसोटी सामन्यात गोलंदाजांकडूनही चांगल्या खेळाचे प्रदर्शन झाले’. असे ढोणी यावेळी म्हणाला. तसेच त्याने मॅककलमच्या झुंजार त्रिशतकी खेळीचेही कौतुक केले.

Leave a Comment