ठाणे पोलिस आयुक्तपदी विजय कांबळे अखेर रुजू

ठाणे- मुंबईचे पोलिस आयुक्तपद न मिळाल्याने नाराज असलेल्या विजय कांबळे यांनी ठाणे पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार मंगळवारी सायंकाळी स्वीकारला. मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर आयुक्तपदाच्या शर्यतीत अहमद जावेद, के. पी. रघुवंशी, राकेश मारिया व विजय कांबळे यांचे नाव चर्चेत होते. सेवाज्येष्ठतेनुसार कांबळे यांची वर्णी लागेल, अशी चर्चा होती. मात्र मुंबई पोलिस आयुक्तपदी मारिया यांची निवड झाल्याने कांबळे नाराज होऊन सुट्टीवर गेले. अखेर ठाणे पोलिस आयुक्तालयात प्रभारी आयुक्त बिपिनकुमार सिंह यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

Leave a Comment