धोनीने कोहलीला कर्णधारपद द़यावे- मार्टिन क्रो

वेलिंग्टन- आगामी काळात टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट टीमची धुरा विराट कोहलीकडे सोपवावी असे मत न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांनी व्यक्त केली आहे. त्याीमुळे पुढील वर्षी होणा-या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या् जिंकण्याच्या शक्यता वाढतील असे मत त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले आहे.

यावेळी पुढे बोलाताना क्रो म्हणाला, ‘टीम इंडियाला येत्याच काळात जर विश्वविजेता हा किताब आबाधित ठेवायचे असेल तर मला वाटते की कर्णधार धोनीने आता आराम करण्याची गरज आहे. केवळ न खेळून आराम घेणेच शक्य आहे असे नाही तर त्याने त्याच्यावरील भार कमी करायला हवा. वर्ल्ड कपपर्यंत त्याने टेस्ट टीमची धुरा ही दुस-याकडे सोपविण्याची गरज आहे. त्यामुळे फ्रेश होऊन वर्ल्ड कपची तयारी केली तर टीम इंडियाला नक्की त्याचा फायदा होईल.’

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच अनिर्णयीत राहिली. या मॅचमध्ये मॅक्क्युलम याने शानदार त्रिशतकीय खेळी केली. त्रिशतक झळकावणारा तो पहिला किवी खेळाडू ठरला असून त्यातने शानदार अशी खेळी केली आहे.

Leave a Comment