क्रमवारीत टीम इंडियाचे दुसरे स्थान कायम

दुबई : वेलिंगटन येथे न्युझलंडविरूद़ध खेळला गेलेला दुसरी कसोटी सामना टीम इंडियाने अनिर्णित राखल्याने आयसीसी कसोटी क्रमवारीतील दुसरे स्थान कायम राखता आले आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धची मालिका ०-१ ने गमावल्यानंतर टीम इंडियाचे ११७ गुणांवरून ११२ गुण झाले आहेत. तिस-या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा (१११ गुण) टीम इंडियाच्या खात्यात जमा झाले आहेत. ऑस्ट्रिलीयापेक्षा एक गुण अधिक जमा झाल्याने टीम इंडियाला कसोटी क्रमवारीतील दुसरे स्था.न आबाधित ठेवता आले आहे.

आागमी काळात ऑस्ट्रेलिया संघाला १ एप्रिलपर्यंत (कट ऑफ डेट) दुस-या स्थानावर पोहचण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. कांगारूंनी ही मालिका बरोबरीत सोडविली, तरी ते क्रमवारीत दुस-या स्थानी पोहचणार आहेत. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून असलेले दुसरे स्थान गमवावे लागणार आहे.

जागतीक क्रमवारीत दक्षिण आफ्रिका १३३ गुणांसह एक नंबरवर असून, त्यांनी अव्वल क्रमांकाचे ४ लाख ५० हजार डॉलरचे पारितोषिक मिळवले आहे. आता आगामी काळात दुस-या आणि तिस-या क्रमांकाचे अनुक्रमे ३ लाख ५० हजार आणि २ लाख ५० हजार डॉलरच्या पारितोषिकासाठी भारत, ऑस्ट्रेलियात चुरस आहे. हे परितोषिक कोणला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment