मनसेचा भरपाई देण्यास नकार

ठाणे – ऐरोली आणि आनंदनगर येथील टोलनाक्यांच्या तोडफोडीप्रकरणी मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी बजावलेली नोटीस मनसैनिकांनी अमान्य केली आहे. पोलिसांनी दबावातून कारवार्‌इ केली आहे, तसेच टोलनाके खासगी कंपनीचे असल्याने त्यांच्या तोडफोडीप्रकरणी सरकार कशी नोटीस बजावू शकते असा सवाल करत अद्याप कोर्टाने दोषी ठरवले नसल्याने भरपार्‌इची रक्कम देण्यास आरोपींनी स्पष्ट नकार दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबर्‌इत २६ जानेवारी रोजी टोल न भरण्याचे आवाहन केल्यावर राज्यभरात मनसैनिकांनी टोलनाक्यांची तोडफोड केली.

याप्रकरणी ठाण्यातील मनसेचे कार्यकर्ते पुष्कराज विचारे, संदीप पाचंगे, विक्रांत अडसूळ, मनोज ठाकूर आणि भिकाजी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल होउन त्यांना अटक झाली. या टोल नाक्यांचे ३ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करत हे नुकसान आंदोलक मनसैनिकांकडून का वसूल करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस मुंबर्‌इच्या उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी या आरोपींना बजावली होती. या नोटीशीवर त्यांनी लेखी जबाब दाखल केला आहे. नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर दबावामुळे त्यांनी आपल्याला अटक केल्याचा दावा मनसैनिकांनी केला आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती करत, तोडफोडीत टोलनाक्याचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले याचा पंचनामा नोटीशीसोबत नसल्याने भरपार्‌इबद्दल भाष्य करण्यास अर्जदारांनी नकार दिला आहे. विशेष म्हणजे, टोलनाके खासगी कंपनीचे असल्याने त्यांच्या नुकसानीची भरपार्‌इ सरकारने कशी मागितली असा सवाल त्यांनी केला आहे. टोलनाक्यांवर कोठेही राज्य सरकारचा उल्लेख नाही, असा दावा या जबाबात आहे. कोर्टात जोपर्यंत गुन्हा सिध्द होत नाही, तोपर्यंत भरपाई देण्याचा प्रश्नच नाही असे सांगून ही नोटीस त्यांनी फेटाळली आहे.

Leave a Comment