
बीड – माढाच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. माढाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्यामुळं, महादेव जानकर नाराज झाले आहेत. महादेव जानकर यांनी माढाच्या जागेचा आग्रह धरलाय. माढ्याची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याबाबत महायुती ठाम असल्यामुळं महादेव जानकर नाराज झालेय. महायुतीच्या जागावाटपात ही जागा राजू शेट्टी यांच्या शेतकरी स्वाभिमान पक्षाला देण्याचं ठरलं आहे. मात्र महादेव जानकर माढ्याच्या जागेकरता आग्रही आहे.
