अॅपलचा नवा आयफोन लवकरच येणार

न्यूयॉर्क – हँहसेट विक्रीत गत वर्षात फारशी चांगली कामगिरी न करणार्‍या अॅपलचा मोठ्या स्क्रीनचा नवा आयफोन लवकरच बाजारात आणला जाईल असे दावा आयडीसी या रिसर्च फर्मकडून केला गेला आहे. हा नवा स्मार्टफोनही आयओएसवर आधारितच असेल असेही त्यांचे म्हणणे आहे.

गेल्या कांही काळात तीव्र स्पर्धा असूनही आणि अनेक स्पर्धक कंपन्या स्वस्त आणि मोठ्या स्क्रीनचे स्मार्टफोन बाजारात आणत असूनही अॅपलने असा कोणताही फोन बाजारात आणलेला नाही. आता मात्र अॅपलला या बाबतीत मागे राहून चालणारे नाही असे या फर्मचे म्हणणे आहे. आक्टोबर ते डिसेंबर या काळात अॅपलने ५.१ कोटी युनिट विकली आहेत आणि त्यांची विक्रीतील वाढ फक्त ६.७ टक्के इतकीच आहे. आयओएस ऑपरेटिग सिस्टिम असलेले स्मार्टफोन आजही लोकप्रिय आहेत असेही या फर्मचे म्हणणे आहे.