सचिनचा महाराष्ट्र शासनाकडून विशेष सत्कार होणार

मुंबई – भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विशेष सत्कार महाराष्ट्र शासनाकडून केला जाणार असल्याचे वृत्त आहे. मात्र हा सत्कार लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर केला जाईल असे सांगितले जात आहे.

गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात २०० वी कसोटी खेळल्यानंतर सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तेव्हाच त्याच्या सत्काराचा विषय चर्चेला आला होता. शासनाने त्यासाठी सात सदस्यीय समितीही नेमली आहे. या समितीत मुख्यमंत्री चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांचाही समावेश आहे. सचिनशी संपर्क झाल्यानंतर सत्काराची जागा, वेळ आणि तारीख ठरविली जाणार आहे असेही समजते.

सचिनला यापूर्वी भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषविले गेले आहे.

Leave a Comment