शिवसेनेकडून राजच्या आंदोलनावर टीका

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या आंदोलनावर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या १२ तारखेच्या आंदोलनाचे स्क्रिप्ट काँग्रेस-राष्ट्रवादीने लिहल असल्याकचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. मला अटक करा असे या नवीन नाटकाचे नाव असल्याचे म्हटले आहे.

आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्याने सर्वच राजकीय प्ख तयारीला लागले आहेत. पुण्याच्या एस.पी. मैदानावरूनदेखील रविवारी एका जुन्या नाटकाची नव्याने घोषणा झाली असल्याेचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. मनसेप्रमुखांचे आवडते नाटक ‘मला अटक करा हो!’ रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाले असून विंगेतून अजित पवार, आर. आर. पाटील, पृथ्वीराज बाबा यापैकी एकाने ‘घंटा’ वाजवताच पडदे सरकून नाटकाला सुरुवात होईल.

प्रत्येक निवडणुकीच्या आधी या सर्व नावांवर नवे नाटक निर्माण करू शकतील. कारण कथासार, संवाद व कलावंत तयार आहेत. नाटकाच्या शेवटी फक्त नायकास ‘अटक’ करून घेणे गरजेचे आहे. तेवढे झाले आणि ही अटक झाली की कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे प्रेक्षक टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करतील व त्याच टाळ्यांच्या गजरात पडदा खाली पडेल अशा स्वरूपाची टीका राज ठाकरे यांच्या वर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकातून करण्याज\त आली आहे.

Leave a Comment