ठाणे- गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये आपणाला डावलले जात असून त्यामुळे पक्षात राहूनही आपली घुसमट होत असल्याची खंत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखवली आहे. ठाण्यामध्ये आयोजीत काँग्रेस सेवादलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस माझाही सेवादल करण्याच्या बेतात आहे. पण तरीही मी गप्प बसणार नाही. माझ्यावर राख साचू देणार नाही. निखारा हा निखाराच राहिला पाहिजे, असे राणेंनी यावेळी स्पष्ट केले आहे. राणेच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये काय चालले आहे याची कल्पना सर्वांना येत आहे.
यावेळी पुढे बोलताना महसूल मंत्री नारायण राणे म्हणाले, आगामी काळात मी माझ्यावर कधीही राख साचू देणार नाही. त्यालमुळे निखाराच कायम राहील. काँग्रेसने प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे दिली पाहिजेत. त्यांचा मान राष्ट्रावादी काग्रेसला पाहिजे. सेवादलाच्या कार्यकर्त्याला सत्तेत स्थान दिले पाहिजे. त्यावेळी डोळ्यासमोर सेवादलाचाच कार्यकर्ता असेल.
गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना टार्गेट करत आहेत. ही टीका योग्य नाही. एखादी व्यक्ती पदावरून जाऊन मी कधी येईन, याची वाट पाहिली जाते. कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेना, भाजपवर टीका करावी. कोणी टीका करण्यासाठी नसेल तर राष्ट्रवादीवरही टीका करा, असा सल्ला कार्यकर्त्यांना देताना काँग्रेसवर टीका करू नका, असे यावेळी बोलताना राणे यांनी स्प ष्ट् केले.