पॅरोलची रजा वाढवण्यासाठी संजयचा पुन्हा अर्ज

मुंबई – पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण पुढे करत सध्या पॅरोलवर सुटका झालेल्या संजय दत्तला त्याची रजा आणखी ३० दिवसांनी वाढवून हवी आहे . यासाठी त्याने अर्ज केला असल्याचे सूत्रांकडून समजते. याआधी २२ डिसेंबर रोजी पॅरोलवर सुटका झालेल्या संजयने पॅरोलची रजा २२ फेब्रुवारी पर्यंत वाढवून घेतली होती.

मात्र अद्याप मान्यताची तब्येत ठीक नसल्याने तिची आणि मुलांची काळजी घेण्यासाठी त्याला आणखी महिनाभर रजा हवी आहे. यामागणीचा त्याने अर्ज केला आहे. मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात शस्त्रात्रे बाळगल्याप्रकरणी संजयला न्यायालयाने दोषी ठरवले आणि त्याला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

Leave a Comment