इंडियन सायन्स काँग्रेस ४५ वर्षानंतर मुंबईत

मुंबई – विज्ञान विषयातील जगभरातील संशोधक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची संधी मुंबई विद्यापीठाला ४५ वर्षानी मिळाली आहे. ‘मानवी विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. हा मेळावा जानेवारी २०१५ मध्ये होणार आहे. विज्ञान विषयासाठी जगभरातील संशोधक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असलेले शतकपूर्ती ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे आयोजन करण्याची संधी मुंबई विद्यापीठाला तब्बल ४५ वर्षानंतर मिळत आहे. जानेवारी २०१५मध्ये पहिल्या आठवडय़ात याचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी देश-विदेशातील सुमारे १० हजारांहून अधिक वैज्ञानिक, संशोधक उपस्थित राहणार आहेत.

‘मानवी विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही या कार्यक्रमाची संकल्पना असेल.शतकपूर्ती झालेल्या सायन्स काँग्रेसची सुरुवात १९१४मध्ये सर्वप्रथम कोलकाता येथून झाली. त्यानंतर १९१९मध्ये मुंबईत सहाव्या सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर १९२६, १९३४, १९६० आणि १९६९मध्ये मुंबईत सायन्स काँग्रेस झाले. त्यानंतर तब्बल ४५ वर्षानी मुंबई विद्यापीठाला पुन्हा एकदा हा बहुमान मिळाला आहे. यासाठी जगभरातील नोबेल लॉरेट आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी दिली.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सायन्स काँग्रेसचे उद्घाटन होईल. ‘मानवी विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या विषयावर यात सखोल चर्चा आणि विश्लेषण केले जाणार आहे. मानवी जीवन सुसह्य आणि सुकर करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोलाची भर घातली आहे. त्याचा उलगडा आणि आव्हानांसंदर्भातही चर्चा होणार असून, अनेक वैज्ञानिक या वेळी विविध विषयांवरील शोधनिबंधांचे वाचन करतील. यंदा झालेल्या १०१व्या सायन्स काँग्रेसचे यजमानपद जम्मू विद्यापीठाला मिळाले होते.

Leave a Comment