औरंगाबादेत दोघींवर बलात्कार, पाच जणांना अटक

औरंगाबाद : सुटी असल्याने मित्रांसोबत देवदर्शन करून घराकडे परतणा-या दोन तरुणींना अडवून त्यांच्यावर ५ नराधमांनी बलात्कार केला. ही संतापजनक घटना औरंगाबादजवळ पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

शेख मुश्ताक (३०, रा. साजापूर), सुभाष बडोगे (३२, रा. जोगेश्वूरी), सुभाष सुखदेव जाधव (२१, रा. करोडी), शेख शाहरुख (२१, रा. करोडी), अनिल उबाळे (२0, रा. करोडी), अशी नराधमांची नावे आहेत. अमरावती व वर्धा जिल्ह्यातील २१ वर्षीय दोन तरुणी आयटीआय केल्या नंतर वाळूज औद्योगिक वसाहतीतील औरंगाबाद ऑटो इंजिनिअरिंग या कंपनीत चार महिन्यांपूर्वी अँप्रेंटिसशिपसाठी आल्या. दोघीही येथील बजाजनगर, छत्रपतीनगर येथे पवार यांच्या वाड्यात एका रूममध्ये भाड्यानी राहतात. त्या किरण रमेश कवडे व नारायण विनायक तुपे या कंपनीतील सहकारी तरुणांसोबत दुपारी ३ वाजता भांगसीमाता देवीच्या दर्शनासाठी बजाजनगर येथून पायी निघाले. गडावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना यातील सुभाष बडोगे या तरुणाने सायंकाळ झाल्यामुळे खाली जाण्यास सांगितले. त्यानुसार ते गडावरून खाली उतरले व बजाजनगरच्या दिशेने चालत घराकडे निघाले.

खड्डय़ांमध्ये लपून बसलेले हे सर्व जण अचानक त्यांना आडवे आले. त्यातील सुभाष बडोगे याने ‘तुम्ही इकडे कशासाठी आले, तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचे का?’, अशी विचारणा करीत या दोन्ही तरुणी व त्यांच्या दोन मित्रांच्या थोबाडीत मारले. त्यानंतर अन्य तिघा जणांनी किरण व नारायण या दोघांना बेदम मारहाण करीत धरून ठेवले, तर दोघा जणांनी या दोन तरुणींना रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डय़ात नेले. जिवे मारण्याची धमकी देत दोन्ही तरुणींना विवस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी तत्कााळ दखन घेत याप्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

Leave a Comment